Breaking News

सीबीएसईला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट


मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात येणारी दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. सीबीएसईची लेखी परिक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा दहावीसाठी 1 लाख 94 हजार 187 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तर, 2017 मध्ये 16 लाख 67 हजार 969 विद्यार्थी परीक्षेला होते. ही आकडेवारी पाहता यंदा परिक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. तर, बारावीसाठी 11 लाख 86 हजार 306 विद्यार्थी बसणार आहे.