Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


मुंबई : प्रभादेवीच्या आदर्शनगरमधील ऋतिक दिलीप घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. परिक्षेचा पहिला पेपर देण्यापूर्वीच त्याचे निधन झाले.दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत असलेल्या ऋतिकला रात्री दीडच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्याला तात्काळ केईएम रू ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. त्याचा मृत्यू परिक्षेच्या तणावामुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून ऋतिकच्या मृत्यूनंतर दहावीच्या परिक्षेचा तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.