घरपट्टी दरवाढीच्या विरोधात मनसेने केली बिलाची होळी
सातपूर वार्ताहर: महापालिकेने केलेल्या घरपट्टी दरवाढीच्या विरोधात मनसेचे युवा नगरसेवक योगेश शेवरे यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी बिलाची होळी केली. माञ या होळीत गौरी, लाकूड तथा होलिका दहन न करता वाढीव घरपट्टी बिलाची आहूती देण्यात आली आहे.
सातपूर विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात आरोग्य समिती उपसभापती तथा मनसे नगरसेवक योगेश शेवरे यांच्या पुढाकाराने मनपाने नव्याने आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी बिलाची होळी करत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
दरम्यान पेट्रोल,डीझेल, गॅस यांच्या सततच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मनपाने घरपट्टी मध्ये अचानकपणे दरवाढ केल्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनतेला अन्यायकारक आर्थिक भुर्दंड नाईलाजाने सोसावा लागणार आहे. मनपा प्रशासनाने केलेली करवाढ मागे घेण्यात यावी अन्यथा मनसेच्या वतीने मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा यावेळी सत्तादारी प्रशासनास निवेदनाद्वारे दिला.दरम्यान आपल्या मागण्याचे निवेदन यावेळी सातपूर विभागीय अधीक्षकांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक योगेश शेवरे, रवी काळे, मनोज अहिरे,आरती शिरडकर,रीना सोनार,भानुमती अहिरे,अतुल पाटील,ज्ञानेश्वर निगळ, विजय आहिरे, मिलिंद कांबळे,,प्रकाश निगळ,सागर निगळ,सुधाकर टावरे,संदीप निगळ आदी मनसेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.