Breaking News

सरपंच व ग्रामसेवकांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत - जिजामाला नाईक निंबाळकर

सातारा, दि. 12, मार्च - गिरवी जि.प.गटातील सरपंच व ग्रामसेवकांनी विकासकामात राजकारण न आणता गावच्या सर्वागीन विकासासाठी एकत्र येवुन प्रयत्न करावेत व उन्हाळ्याच्या प्राश्‍वभुमीवर अधिका-यांनी पाण्याचे व गरज भासल्यास टँकरचे नियोजन करून ठेवावे असे प्रतिपादन जि.प.सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले. 


त्या म्हणाल्या की, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, कृषी आदी प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राब विल्यास तसेच 14 व्या वित्त आयोग निधीतून उपलब्ध होणार्या निधीचा योग्य विनियोग केल्यास विकास कामासाठी आर्थिक अडचण येणार नाही याची ग्वाही देत त्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा एकविचार व एकसंघपणा अधिक महत्त्वाच असुन अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त शासकिय योजना घरकुल, महिला बालकल्याण,समाजकल्याण पशुसंवर्धन विभागाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवाव्यात असे आवाहन केले. तसेच आढावा बैठकीत महावितरण विभागाच्या विरोधात आलेल्या तक्ररारी वर नाराजी व्यकत करीत पुढील मिटींगमध्ये महावितरणच्या अधिका-यांना बोलविण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. या प्रभाग सभेत प्रामुख्याने 14 व्या वित्त आयोग निधीचा आराखड्याप्रमाणे झालेला खर्च व त्यामधील प्रलंबीत कामे मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी केेलेले नियोजन गावनिहाय जलसंधारण व नागरी सुविधा पुर्ततेसाठी केलेले नियोजन, वसुली, घरकुल, व गावातील अडचणी याबाबत सरपंच व ग्रामसेवकांनी मा हिती दिली. यावेळी वाठार निंबाळकरचे ग्रामसेवक महादेव आढवा यांना आर्दश ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्या बद्दल यावेळी त्यांचा जि.प.सदसय अ‍ॅड.जिजामाला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.