Breaking News

डहाणू - विरार दरम्यान 5 वर्षात अपघातात 613 जणांचा बळी

पालघर, दि. 12, मार्च - पश्‍चिम रेल्वेच्या डहाणूदरम्यान रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या अपघातात 613 जणांचा बळी गेला आहे.वसई-विरारची लोकसंख्या वाढल्यामुळे येथील वर्ग पालघर, डहाणूकडे स्थलांतरीत होत आहे. पश्‍चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने येथील प्रवाशांना आता ट्रेनच्या दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागतो आहे. डहाणू-विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही.


गेली अनेक वर्षे येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना व येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. येथील प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे यानिमित्ताने होत आहे.मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई-विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला. मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नाग रिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर, डहाणूची निवड केली.