पार्वताबाई गायकवाड यांचे निधन
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पार्वताबाई माधव गायकवाड (वय- ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नांतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी व विखे पाटील सह. साखर कारखान्याचे माजी संचालक माधवराव उर्फ भाऊ गायकवाड, शेतकी अधिकारी शहाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड यांच्या मातोश्री तर जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहीणी निघुते यांच्या त्या आजे सासू व अण्णासाहेब निघुते व किशोर निघुते यांच्या त्या आजी होत्या.