विभागीय स्पर्धेत ‘एमएमवायटीसी’ खेळाडूंना पदके
राज्य शासनाच्या क्रिडा व युवक संचालनालयच्यावतीने नाशिकमध्ये ‘चला खेळूया’ या उपक्रमाअंतर्गत झालेल्या नाशिक विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेत महावीरनगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटर (एमएमवायटीसी ) च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले. यामुळे नगर जिल्हयाचे नाव नाशिक विभागात उंचावले आहे.
महाराष्ट्र शासन नाशिक विभागीय क्रिडा संकुल समितीच्यावतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून महावीरनगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या मुग्धा कुलकर्णी हिने रोप मल्लखांब - लहान गटात रौप्य् पदक , गौरी गौंड हिने मोठ्या गटात रौप्य् पद , जिमन्यास्टिक या क्रीडा प्रकारात गार्गी मोहोळे हिने लहान गटात एकूण दोन रौप्य पदके तसेच योगा या प्रकारात मुग्धा कुलकर्णी हिने रौप्य् पदक मिळवले. या यशाबद्दल एमएमवायटीसीच्यावतीने उद्योजक मोहन मानधना यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे , प्राजक्ता दळवीसह मोठ्या संख्नेने खेळाडू उपस्थित होते. यावेळी मानधना यांनी शुभेछया देऊन या खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
गेली सात वर्षे रोज संध्यकाळी २ तास हे खेळाडू उमेश झोटिंग यांच्या मार्गदेशनाखाली सराव करतात. त्यांना प्रणिता तरोटे, प्राजक्ता दळवी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. बालिकाश्रम रोडवरील महालक्ष्मी उद्यानासमोर एमएमवायटीसी हा क्लब आहे. या ट्रेनिंग सेंटरमधील खेळाडूंनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळविलेली आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा क्रिडाधिकारी बोडखे, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष अनिल उत्पात आदींनी अभिनंदन केले.