विविध कारणांवरून नागरिक स्वस्त धान्यापासुन वंचीत.
कर्जत तालुक्यातील 20 हजार 924 शिधापञिकाधारकांना म्हणेजच कुटूंबांना धान्यापासून वंचीत रहावे लागत आहे. यात विभक्त कुटुंबधारकाचांही समावेश आहे. धान्य मिळण्याची मागणी शिधापञिकाधारकांमधून होत आहे. तालुक्यात एकूण 135 धान्य दुकाने आहेत. आजमितीस तालुक्यात 65 हजार 791 शिधापञिकाधारकांनाच शासनाच्या पुरवठा विभागाकडून धान्य पुरविले जाते. एकूणच 1 लाख 77 हजार 406 लोकानांच धान्याचा लाभ होतो. विभक्त झालेल्यांना माञ या धान्यापासून वंचीत राहावे लागत आहे. एकूणच 2 लाख 80 हजार नागरिक शासकीय वितरण प्रणालीच्या धान्याचे लाभार्थी आहेत. 20 हजार कार्डमधील 84 हजार 506 नागरिक धान्यापासुन वंचीत आहेत.