Breaking News

गेल्या तीन महिन्यांत चार हजार तीनशे रुपयांचा दंड वसुल

सातारा - शहर स्वच्छ राहावे तसेच लोकांचे आरोग्यही चांगले राहावे, यासाठी क-हाड शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेतली जात आहे. शहरातून प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध लादत लोकांना स्वच्छतेविषयी सवय लागावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना कोणी दिसल्यास त्याचक्षणी त्याच्या हातात शंभर रुपयांची दंडाची शास्तीची पावती दिली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल चार हजार तीनशे रुपयांचा दंड संबंधित लोकांकडून आकारण्यातही करण्यात आला आहे.

कर्‍हाड नगरपालिकेनेही शहर स्वच्छतेसाठी जणू शिवधनुष्यच उचलले की काय? असा प्रश्‍न सध्या सर्वांना पडत आहे. ठिकठिकाणी स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, प्लास्टिकबंदी कारवाईची मोहीम, लोकांमध्ये घनकच-यापासून गांडूळ खत निर्मिती असे उपक्रम राबवित त्यांच्यात जनजागृती केली जात आहे. पालिकेतील सर्वच नगरसेवक, नगरसेविकांबरोबर स्वच्छतादूतही गृहभेटी देऊन लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, म्हणून बहुमोल मार्गदर्शन करीत आहेत.