Breaking News

काकडीचे उत्पन्न जोरात मात्र दाम कवडी मोल; शेतकरी हवालदिल


उन्हाळ्यात कमी पाण्यावर काकडीची लागवड करुन दोन पैसे मिळविण्याची धडपड शेतकर्‍याची सुरू असते. परंतू आज कवडीमोल भावाने काकडी विकण्याची वेळ काकडी उत्पादक शेतकर्‍यांवर येत आहे. तीन वर्षांपासून शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कुठल्याच मालाला भाव नाही. अतिरिक्त उत्पन्नामुळे तसेच मागणी कमी असे मुख्य कारण असल्याचे व्यापारी वर्गात बोलले जात आहे. काकडीसाठी एकरी तीस हजार रुपये खर्च येत असुन नफा तर दूरच त्यासाठी खर्च केलेले फिटने सुद्धा मुश्कील झाले आहे. काही शेतकर्‍यांनी तर कमी भाव लक्षात घेता काकडी नांगर फिरविणे पसंत केले आहे. पानेगाव येथील शेतकरी अशोक मते यांनी सांगितले की, सध्या मोंढ्यावर काकडी नेण्यासाठी परवडत नाही परंतू आज ना उद्या भाव येईल अशी अशा असल्याने आज आम्ही काकडी शेतात ठेवली आहे.