Breaking News

महिला दिनानिमित्त राज्यात सुरु होणार ‘अस्मिता योजना’


मुंबई : ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणार्‍या अस्मिता योजनेचा शुभारंभ उद्या जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना फक्त 5 रुपयांत 8 सॅनिटरी नॅपकीन मिळणार आहेत. गुरूवारी दुपारी 1.30 वाजता मुंबई विद्यापीठातील कॉन्व्हकेशन हॉल येथे होणार्‍या या समारंभात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर हेही उपस्थित राहणार आहेत.