Breaking News

व्यंकटेश पतसंस्था घोटाळा प्रकरण, आरोपी दीड महिने झाले तरी मोकाट


सोनई, श्री व्यंकेटश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थतेत कर्मचार्‍यांनी 1 कोटी 93 लाख 7 हजाराचा गैरव्यवहार करून ठेवीदारांचे कोट्यवधीची रक्कम हडप केल्याप्रकरणी लेखापाल सोमाणी यांनी गुन्हा दाखल केल्यापासून तब्बल दीड महिना झाला तरी आरोपी मोकाट असून तपासी अधिकार्‍यांची अटक करण्यास टाळाटाळ करत असून आश्‍चर्य व्यक्त होत आहे, तरी ठेवीदारांनी आरोपींना अटक करून जामीन मंजूर करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, सोनाईतील व्यापारी नावलौकीक विश्‍वसनीय समजली जाणारी व्यंकेटश पतसंस्थतील कर्मचारी मॅनेजर श्यामसुंदर खामकर, क्लार्क गणेश गोरे व कॅशीयर गणेश तांदळे यांनी संगनमताने स्वतःच्या फायद्यासाठी ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बनावट सही शिक्याचा वापर करून लांबवले, याप्रकरणी संबंधित अहवालानुसार दोषी ठरवून नगर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तरी देखील तपासी अधिकारी बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे, गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाले आहे, दरम्यान सदर आरोपी गावातच फिरताना दिसत आहे, आमचे कोणी काही करूं शकत नाही असे काही ठेवीदारांनी प्रतिक्रिया दिली, लवकरच ना.विखे यांची भेट घेऊन ठेवीदारांचे समस्येवर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही तर सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करून घरोघरी ठिय्या आंदोलने हाती घेण्यात येणार आहे. गोरगरीबाचा पैसा मिळाल्याशिवाय ठेवीदार गप्प बसणार नाही.