Breaking News

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दिड वर्षाची चिमुरडी जखमी


श्रीरामपूर तालुक्यातील गांधीवाडी येथे दिड वर्षे वयाच्या चिमुरडीला दुपारी एकच्या सुमारास मोकाट कुत्र्याने पाठीमागून येऊन अचानकपणे डोक्यावर जोरदारपणे चावा घेतला. या मुलीचे डोक्यावरची कातडी ओरबडून बाहेर पडल्याने सदर मुलगी रक्तबंबाळ झाली. या मुलीवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ही मुलगी कार्यक्रमानिमित्त पालकांसमवेत येथे आली होती. घरातून बाहेर आली असता अंगणात घरोसमोरच मोकाट कुत्र्याने तिच्यावर हा हल्ला केला. विशेष म्हणजे मोकाट कुत्र्यांविषयी ‘दै. लोकमंथन’च्या आजच्या {दि. १२} अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. कुत्र्याने हल्ला करताच आजूबाजूच्या लोकांनी धावून या मुलीस कुत्र्यापासून वाचविले. या मुलीला ढोकचौळे कुटुंबियांनी तात्काळ कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तिला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा सल्ला दिला. मात्र या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने फिला अहमदनगर येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे ढोकचौळे कुटुंबासह परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, गांधीवाडी परिसरात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. या मोकाट कुत्र्यांचा रांजणखोल ग्रामपंचायतीने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी अमर दत्तात्रय ढोकचौळे, रघुनाथ ढोकचौळे, अविनाश ढोकचौळे, अमोल ढोकचौळे, अजित मापारी, अमोल बोंबले, विजय ढोकचौळे, रोहित ढोकचौळे, रमेश ढोकचौळे, अशोक ढोकचौळे, महेश ढोकचौळे, संजय ढोकचौळे, समर्थ ढोकचौळे, हरेश ढोकचौळे आदींनी केली आहे.