Breaking News

भारिपच्या नगर तालुकाध्यक्षपदी सागर भिंगारदिवे यांची नियुक्ती


भारिप बहुजन महासंघात संघर्ष युवा प्रतिष्ठनचे सागर भिंगारदिवे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या भारिपच्या जिल्हा पदाधिकारींच्या बैठकित भिंगारदिवे यांची सर्वानुमते नगर तालुकाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली.

भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय गवारे, उपाध्यक्ष पेत्रस गवारे, शहर जिल्हाध्यक्ष अमोल निकाळजे, युवक अध्यक्ष सनी क्षेत्रे, प्रकाश थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित सागर भिंगारदिवे यांना नगर तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
संजय गवारे म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगार हा मोठा प्रश्‍न समाजापुढे आहे. जातीचे राजकारण बाजूला सारुन बहुजन युवकांना एका व्यासपिठावर घेवून येण्यासाठी भारिपच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहत आहे. या चळवळीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्‍न सोडवले जाणार आहे. पक्षामध्ये येण्यासाठी युवकांची ओढ लागली असून, युवकांना संधी देण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नगर तालुक्यात सागर भिंगारदिवे यांचे असलेले उत्तम युवकांचे संघटन व सामाजिक प्रश्‍नांवर चालू असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची नगर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पेत्रस गवारे म्हणाले. सागर भिंगारदिवे म्हणाले की, वंचितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समाजाच्या तळागाळा पर्यंन्त भारिपच्या माध्यमातून कार्य करणार आहे. बहुजन युवकांचे संघटन करुन राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून समाजातील प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेणार असून, या कार्यात युवकांनी स्वयंफुर्तीने पुढाकार घेवून ही चळवळ मजुबत करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी हरिश चक्रनारायण, विजय (अंकल) गायकवाड, इंदूमती गायकवाड, अमोल शिंदे, गजूभाऊ कराळे, राहुल अल्हाट, मयुर भिंगारदिवे, आकाश शिंदे, संकेत लोखंडे, शुभम भिंगारदिवे, दिपक जाधव, प्रथमेश शिंदे, अक्षय हारेर, सुरज साठे, मनोज ठाकुर, प्रशांत शिंदे, जॉन कांबळे, सुभाष वाघमारे, किरण भिंगारदिवे, सौरभ भिंगारदिवे, किरण साळवे, पवन भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, सचिन बागडे, गणेश कार्ले, पवन कोतकर आदि उपस्थित होते.