Breaking News

तांबोळी खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा : मागणी


सुमारे महिन्याभरापूर्वी कोपरगाव येथे गुंडांकडून झालेल्या मारहाणीतून अकबर रज्जाक तांबोळी यांचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीवर तात्काळ कडक शासन होऊन श्रीरामपूर येथे राहणाऱ्या अकबर तांबोळी यांच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी, यासाठी संगमनेर तालुका तांबॊळी समाजाच्यावतीने प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिक्षक, तहसीलदार व पोलिस निरीक्षक आदींना निवेदन देण्यात आले.

याबाबत अंजुमन इत्तेहाद तंबोलियन जमात, संगमनेर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, कि १७ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथील अकबर रज्जाक तांबोळी, हे लग्नासाठी धुळे येथे जात होते. यावेळी ते कोपरगाव येथील तपोभूमी चाैकात धुळेला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत थांबलेले होते. काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी त्यांच्या अंगावर वाहन घालून काहीही कारण नसताना त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर तांबोळी हे मयत झाले. या खूप प्रकरणात कुटंबाचा कर्ता पुरूषच गेला आहे. तरी शासनाने अचानक निष्कारण बळी गेलेल्या तांबोळी यांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात करण्यात आली आहे. 

यावेळी समाजाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष शफी तांबोळी, हारुण कमरुद्दीन तांबोळी, हबिब करीम तांबोळी, राजमहमंद हाजी बालम तांबोळी, डॉ. ताज तांबोळी, अलताफ शेख, गुलमनबी बाबासाहब तांबोळी, हाजी शब्बीर लतीफ तांबोळी, जावेद तांबोळी, शकिल तांबोळी, अनिस तांबोळी, असिफ तांबोळी, सादिक तांबोळी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.