Breaking News

नियमपालनाने कामात अचूकता : प्रा.जोशी; ‘मालपाणी’चा सुरक्षा सप्ताह यशस्वी


कामगारांवर पुत्रवत प्रेम करणे हे, मालपाणी उद्योग समुहाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेला येथे सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्याने जीवनाला धोका निर्माण होत नाही. तसेच आत्मविश्वास वाढतो. कामात अचूकता येते, असे मत प्रा. भगवान जोशी यांनी व्यक्त केले. 

येथील मालपाणी उद्योग समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यवस्थापक रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी, रविंद्र कानडे, विशाल वाजपेयी, मंगेश उणवणे, किशोर थोरात, संतोष राऊत, सुरक्षा विभागाचे प्रमुख दादासाहेब सुपेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी सुरक्षा विभागाच्या कर्मचार्‍यांनी ‘सुरक्षा बाबा की जय’ ही बोलकी नाटिका सादर करून त्यातून कामगारांना सुरक्षेचा संदेश दिला. विनोदी शैलीतील या नाटिकेने सर्वांना पोट धरून हसवित प्रबोधन करीत अंतर्मुखही केले. नाटिकेच्या सुंदर सादरीकरणाबद्दल प्रा. जोशी यांनी सर्व कलाकारांना रोख स्वरूपात बक्षीस दिले. सुरक्षा सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या कामगारांना यावेळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले.