Breaking News

शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक सागर फडके यांच्याकडून स्वखर्चाने कचरा गाडी उपलब्ध

नगर परिषदेला वाहन खरेदी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे व शहरात वाढत चाललेला कचरा ही मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे वॉर्ड क्रमांक 16 चे नगरसेवक सागर फडके यांनी स्वखर्चातून आठवड्यातून दोन दिवस सोमवार व गुरवारी कचरा गाडी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आपल्या प्रभागात केली आहे.

या कचरा गाडीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा मेघाताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. लड्डा मॅडम, माहेश्‍वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री धूत, उर्मिला सारडा याही यावेळी उपस्थित होत्या.
जोपर्यंत नगर परिषदेकडून कचरा गाडीची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत या दोन दिवशी ही गाडी सुरू राहणार आहे. क्र. 16 वार्डचे नगरसेवक सागर फडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.