कुळधरण भागात ज्वारी, हरभरा मळणी कामाला वेग
कर्जत तालुक्यातील कुळधरण भागात रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा आदी पिकांच्या मळणीची कामे वेगात सुरु आहेत. ज्वारी पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने कडब्याची टंचाई निर्माण झाली असुन दर वाढले आहेत.
कुळधरणसह धालवडी, राक्षसवाडी कोपर्डी, बारडगाव, जलालपुर भागात ज्वारी काढणीची कामे आटोपली आहेत. मळणी करुन धान्य घरी नेण्याचे वेध शेतकर्यांना लागले आहेत. उसाची लागवड अधिक झाल्याने इतर पिकांचे प्रमाण घटले आहे. खेड, गणेशवाडी, भांबोरा, सिद्धटेक या भीमा नदीच्या पट्ट्यात तर हे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यातील गव्हाचे पीकही काढणीला आले आहे. मळणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. मात्र पीकाचे क्षेत्र कमी असलेल्या शेतकर्यांना त्याचा फायदा मिळत नाही.डीझेल इंजिनवर चालणार्या पारंपरिक मशिनद्वारे मळणीची कामे आटोपली जात आहेत. घरातील महिला, मुले यांनाही या कामात घेवून खळी उरकली जात आहेत.