मेगा फूड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल - मुख्यमंत्री
सातारा, दि. 03, मार्च - शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फूड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फूड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देगाव-सातारा एमआयडीसीमध्ये सातारा मेगा फूड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हर सिमरतकौर बादल, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सातारा मेगा फूड पार्कचे प्रवर्तक हणमंतराव गायक वाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, रासायनिक खतांच्या अती वापरामुळे आपला शेतीशी असणारा संवाद तुटत चालला आहे. जैविक व नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा संवाद सुरू होवू शकतो. त्यासाठी शेतकर्यांच्या बांधापर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. शेतीमालाच्या असमतोल उत्पन्नामुळे शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये असणार्या दरीचा फायदा समाजातील काही घटक घेत असतात. या घटकांना आळा घालण्यासाठी फूूड पार्क हा महत्वाचा भाग ठरणार आहे. शेतीच्या उत्पन्नाला शाश्वत करण्यासाठी फूड पार्क हा महत्वाचा घटक आहे. केंद्राच्या फूड पार्कची योजना अत्यंत महत्वाची असून ती जलद गतीने विस्तारत आहे. केंद्राच्या अन्न प्रक्रिया धोरणाला सुसंगत असेच राज्याने धोरण तयार केले आहे. त्याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना होत आहे.
देशातील सर्वाधिक 54 कोल्ड स्टोरेजची साखळी महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे. राज्य सरकार कोल्ड स्टोरेजला कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात सौर ऊर्जेवर कोल्ड स्टोरेज नेण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. राज्यातील शेतकर्यांना मुबलक आणि अखंडित वीज देण्यासाठी शेतकर्यांचे वीज फिडर सौर उर्जेवर टाकण्याचे काम सुरू आहे, त्याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. शेतीच्या क्षेत्रात बीव्हीजी कंपनीने मोठे काम केले आहे. बीव्हीजी कंपनीने निती आयोगाच्या समोर या विषयी केलेले सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. त्यांच्या माध्यमातून शेतकर्यांनी केलेली शाश्वत शेतीतील यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीच्या क्षेत्रात फूड पार्कच्या माध्यमातून नवी क्रांती होणार आहे. शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी फुड पार्कची मोठी आवश्यकता आहे. येत्या काळात त्याची आवश्यकता भासणार असून त्यामध्ये महाराष्ट्रच अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, परिसरातील शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी फूड पार्क महत्वाची भूमिका बजावणार आहे. या फूड पार्कमुळे 5 हजार लोकांना रोजगार मिळणार असून 25 हजार शेतकर्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. केंद्र सरकार शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवत आहे. शेतकर्यांनी अशा उपक्रमांचा फायदा घ्यावा. फुड पार्क हा मेक इन इंडियासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. दूध आणि फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले .
खा. शरद पवार म्हणाले, शेतकर्यांचे माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेत मालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फूड पार्कची आहे. महाराष्ट्रातील पहिला फूड पार्क सातार्यात बनला याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात हणमंतराव गायकवाड म्हणाले, फूड इंडस्ट्री ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे. सातारा फूूड पार्कचे ठिकाण हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या भागात उत्पादीत होणार्या स्ट्रॉबेरी, डाळींब, फणस यांसारख्या फळ भाज्यांवर प्रक्रिया करून ते निर्यात करण्यात येणार आहे.