कामगार सेनेच्या कामबंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
डोंबिवली, दि. 03, मार्च - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे प्रभाग क्षेत्र अधिकार भागाजी भांगरे यांना भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी केलेल्या अपहरण घटनेचा निषेध महणून पालिकेच्या कामगार सेनेने कामबंद आंदोलन केले. कामगार सेनेच्या या कामबंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन यशस्वी झाले.
अनधिकृत धाब्यावर कारवाई केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजप व मनसेच्या नगरसेवकांनी अधिकार्याचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून म्युनिसिपल कामगार सेनेने गुरवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. महापालिकेचे अधिकारी भागाजी भांगरे यांनी अनधिकृत धाब्यावर कारवाई केली होती. याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी भांगरे यांची गाडी अडवून, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचे अपहरण केल्याचे भांगरे यांची तक्रार होती. नगरसेवकांकडून पालिका अधिका-यांसमवेत करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीचा निषेध म्हणून म्युनिसिपल कामगार सेनेने काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.