Breaking News

उन्‍हाळी सुट्टीत शिक्षकांची कार्यशाळा : विखे


जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थी कोणत्‍याही क्षेत्रात मागे पडू नये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी जिल्‍हा परिषेच्‍या सर्व शाळांच्‍या शिक्षकांची उन्‍हाळी सुट्टीत कार्यशाळा घेण्यात येणार आहे, अशी घोषणा जि. प. अध्‍यक्षा शालिनी विखे यांनी केली.

लोणी येथे जिल्‍हा परिषद गटाच्यावतीने आयोजित बाल आनंद मेळाव्‍याप्रसंगी त्या बोलत होत्‍या. प्रांरभी अध्‍यक्षा विखे यांच्या हस्ते विद्यार्थ्‍यांनी लावलेल्‍या स्‍टॉलचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध प्रकारच्‍या वस्तू व पदार्थांची विखे यांनी पाहाणी केली. राहाता पंचायत समितीच्‍या सभापती हिराबाई कातोरे कायर्कर्माच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्‍हा शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, सिनेट सदस्‍य अनिल विखे, उपसभापती बाबासाहेब म्‍हस्‍के, जिल्‍हा परिषद सदस्‍य दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राम्‍हणे, नंदा तांबे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षण अधिकारी मिना शिवगुंडे, सरपंच मनिषा आहेर, लोणी बुद्रुकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, ग्रामपंचायत सदस्‍य भाऊसाहेब विखे, सुनिता चव्‍हाण, ग्रामपंचायत सदस्‍य संदिप खर्डे, राजेंद्र घोगरे, शिक्षण विस्‍तार आधिकारी ज्ञानेश्‍वर वाकचौरे, सुभाष पवार यांनी आभार मानले. प्रा. अमोल सावंत, प्रा. महेश चंद्रे आदींसह विविध संस्‍थांचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्‍थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्‍हा शिक्षण अधिकारी रमाकांत काटमोरे यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी शिक्षण विस्‍तार अधिकारी ज्ञानेश्‍वर वाकचौरे यांनी प्रास्‍ताविक केले.