यशस्वीतेसाठी द्वादशसूत्री महत्वाची : चव्हाण
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मप्रियता, महत्वाकांक्षा, आत्मविश्वास, निर्णयशक्ती, सर्जनशीलता, अभिव्यक्ती, विधायक वृत्ती, एकाग्रता, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य, समायोजन क्षमता व भावनिक सुरक्षितता या सूत्रांचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन राजेश चव्हाण यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. प्रविण गायकर होते. यावेळी प्रा. अमोल सावंत, प्रा. महेश चंद्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. थोर शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या जीवनकार्याचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.