Breaking News

नागपुरात तीन तडजोड न्यायालये सुरू होणार

नागपूर  - विदर्भातील 690 बांधकाम प्रकल्पांची महारेरा प्राधिकरणाकडे नोंदणी झाली असून विदर्भासाठी नागपुरात 3 तडजोड न्यायालये स्थापन करण्यात आल्याची माहिती महारेराचे सचिव रमेश प्रभू यांनी आज, शुक्रवारी पत्र परिषदेत दिली. येत्या गुढीपाडव्यापासूनाचे नवे कार्यालय जूने प्रशासकीय भवन येथे सुरू होत असून येथे या तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतील, असे प्रभू यांनी सांगितले.

अनेक प्रकरणे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायीक (डेव्हलपर) यांच्यातील विसंवादामुळे उद्भवतात. संवादा अभावी उद्भवलेल्या प्रकरणांत दोघांनाही मनस्ताप होतो. अशा प्रकरणात प्राधिकरणाबाहेर तडजोड करता यावी म्हणून नागपुरात तीन तडजोड न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायतचे तीन व बांधकाम व्यावसायीकांचे तीन असे सहा प्रतिनिधी राहिल. प्रत्येकी दोन सदस्यांचा एक असे एक न्यायालय राहिल. ग्राहक पंचायतचे गजानन पांडे, नरेंद्र कुलकर्णी व अ‍ॅड. गौरी चांद्रायण तर क्रेडाई या बांधकाम व्यावसायीक संघटनेचे संतु चावला, सुनील दुधलवार व प्रशांत सरोदे हे तीन प्रतिनिधी राहिल, असे प्रभू यांनी सांगितले.