महिला दिनी पोलीस दलातील रणरागिणींचा सन्मान
ठाणे - धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने महिला दिनानिमित्त ठाण्यातील मासुंदा तलाव,जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक र स्मारक येथे धनगर समाजातील ठाणे,मुंबई, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला.
सर्वसामान्याच्या रक्षणासाठी चूलमुल या संकल्पनेतून बाहेर पडत पोलीस दलात योगदान देण्याच्या प्रांजळ उद्देशातून पोलीस दलात सामील होऊन कर्तबगारी बजावणार्या धनगर समाजातील महिलांनी आपल्या कर्तबगारीवर पोलीस दलात पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशी मजल मारली. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाबाबत समाजाद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची अभिमानास्पद थाप देत त्यांचा शाल, श्रीफ़ळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.