प्रहार अपंग क्रांती आंदोलन शिष्टमंडळाची अधिकृत बैठक
शेवगाव , सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे अध्यक्षतेखाली दिल्लीत प्रहार अपंग क्रांती आंदोलन शिष्टमंडळाची आधिकृत बैठक सपन्न झाली. अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्यासाठी प्रहार टिम दिल्लीत दाखल झाली आहे.
अपंगांचे अर्ज जास्त प्रमाणात आले असल्याने योजनेचा लाभ देता येत नाही असे उत्तर या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे डायरेक्टर राव यांनी दिले. यातून सरकार अपंगांना गाजर दाखवत असल्याचे उघड होत आहे.
रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पाच लाख रुपयेचा विमा योजनेत अपंगांना 10% आरक्षण ठेवून सर्व अपंगांना पाच लाखाचा विमा देऊ असे सांगितले. परंतु सरकार जर अपंगांना दोन लाखाचा विमा देऊ शकत नाही तर पाच लाखाचा कुठून देणार, म्हणजे हेही गाजरच. आता अपंगांनी ठरवायचे आहे काय ते दोन लाखांचा विमा पाहिजे की गाजर.आता तरी एकत्र या सरकारला दाखवा भिक नको हक्क द्या. प्रहारच्या शिष्टमंडळाने दिल्लीत आवाज उठवला .आता सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. या शिष्टमंडळात पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुर्हाटकर, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, शेवगाव अध्यक्ष चांद शेख, हमिद शेख, रामचंद्र तांबे, सिद्धार्थ उरकुडे, संभाजी गुठे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.