कोळगावथडीच्या ग्रामस्थांनी दाखविले आ. कोल्हेंना काळे झेंडे!
कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोळगावथडीच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता परस्पर या कामाचे उदघाटन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत घाईघाईने उरकून घेतले. पदाधिकारी व ग्रामस्थांना या कार्यक्रमापासून दूर ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे आ. कोल्हे यांच्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा तीव्र निषेध नोंदविला.
यासंदर्भात कोळगावथडीचे उपसरपंच अप्पासाहेब जाधव यांनी सांगितले, की तालुक्यातील कोळगाव-थडी व उक्कडगाव ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी माजी आ. अशोक काळे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. या दोन्हीही प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी देऊन कोळगावथडीसाठी ५२ लाख ६४ हजार तर उक्कडगावसाठी १ कोटी २९ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र असे असले तरी या योजनेतील अडथळे मात्र युवा नेते आशुतोष काळे यांनीच दूर केलेले आहेत. या योजनेसाठी आबश्यक असणारे कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे या आणि अन्य अनेक प्रकारच्या अडचणी त्यांनी दूर केल्या. त्यांच्या सूचनेनुसार कोळगावथडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उदघाटन अतिशय साध्या पद्धतीने कोळगावथडी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी करण्याचे ठरविले होते. मात्र आ. कोल्हे यांनी घाईघाईने उदघाटन करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी राजेंद्र गवळी, विठ्ठल जगताप, भास्कर मेहेरखांब, भिकन निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, कैलास लुटे, विलास निंबाळकर, नंदकिशोर निंबाळकर, भाऊसाहेब लुटे, दिनकर वाकचौरे, अॅड. शपिक शेख, गणेश निंबाळकर, सचिन काळे, अप्पासाहेब काळे, वाळीबा निंबाळकर, सोपान शेवाळे आदी उपस्थित होते.