Breaking News

के.के. रेंज प्रश्नासंबंधीत सुजीत झावरेची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांबरोबर बैठक


पारनेर/प्रतिनिधी/- पारनेर नगर व राहुरी तालुक्यातील अनेक गावे लष्कराच्या के.के. रेंज मध्ये येत असून ही गावे यातून वगळण्यात यावे. यासाठी सुजीत झावरे हे अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असून त्यांनी याबाबत देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासोबत बैठक घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील उपस्थित होते. 

के.के रेंज संदर्भात पारनेर तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात मा. केंद्रीय मंत्री शरद पवार यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी आपण दिल्ली येथे हा प्रश्न मांडून त्याबाबत मार्ग काढू असे सांगितले होते. त्यानुसार मंगळवार दि. ६ रोजी शरद पवार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व सुजित झावरे यांची दिल्ली या ठिकाणी बैठक झाली. त्यात भामरे यांनी संरक्षण विभागाच्या अधिकार्यांना के.के .रेंज संदर्भात त्वरित बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असून त्यातून मार्ग निघणार आहे.