Breaking News

भाजपाच्या बैठकीला तालुकाध्यक्ष कोरडे, अश्विनी थोरात, भिमा औटी गैरहजर


पारनेर/प्रतिनिधी /- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पारनेर तालुका भाजपाच्या वतीने पक्षवाढी, बुथप्रमुख, गणप्रमुख, विस्तारक, शक्तीकेन्द्र या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या बैठकीला तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, महिला तालुकाध्यक्ष अश्विनी थोरात, शहराध्यक्ष भीमा औटी बैठकिस गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे. 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते वसंत चेडे होते. तर सरचिटणीस डॉ. अजित लंके, सुभाष दुधाडे, पोपट मोरे, दादा शिंदे, महेन्द्र नरड, बबनराव डावखर, डॉ. सरोदे, विश्वास रोहकले, बाळासाहेब नरसाळे, चंन्द्रभान ठुबे, संभाजी आमले, अमोल मैड, निलेश कदम, सौ. अनुराधा पवळे, वैभव झंजाड आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

आपल्या प्रास्ताविकात डॉ. लंके म्हणाले की, पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गट, गण, निहाय सक्रिय कार्यकर्त्यांची नेमणुक करणे. त्यांच्यात सुसंवाद वाढवावा यासाठी प्रयत्न करणे, पुढील काही काळात येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची ताकद निर्माण करणे ,पक्ष वाढीसाठी गावोगाव शाखा तयार करणे, या सर्व विषयावर गट व गण निहाय चर्चा करण्यात आली. 

अध्यक्षस्थानावरुन चेडेनी , पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब, दिव्यांग, बहुजन समाजातील नागरिकांना शासकिय योजनांची सविस्तर माहीती देण्यासाठी व प्रकरणांची अंमलबजावऩी करण्यासाठी विस्तारकाच्या माध्यमातुन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम ग्राउड लेव्हलला करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी बबनराव डावखर, बाळासाहेब नरसाळे यांचाही भाषणे झाली. आभारप्रदर्शन चन्द्रभान ठुबेनी मानले.