Breaking News

पारनेर महाविद्यालयात तृतीय पदवी ग्रहण समारंभाचे आयोजन


पारनेर/ प्रतिनिधी /- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अंड सायन्स कॉलेज, पारनेर महाविद्यालयाने पदवी प्राप्त विदयार्थ्यांसाठी सोमवार दिनांक १२ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या राजश्री शाहू सभागृहात पदवी ग्रहण समारंभाचे आयोजन केले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर व महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी डॉ सुधीर वाघ यांनी दिली. 

पदवीग्रहण समारंभाचे आयोजन न्यू आर्ट्स कॉमर्स अंड सायन्स कॉलेज आणि श्री. ढोकेश्वर महाविद्यालय टाकली ढोकेश्वर तसेच श्री.मुलिकादेवी महाविद्यालय निघोज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहेत. 

समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी मा.डॉ.विद्या गारगोटे ह्या प्रमुख अतिथी म्हणून दीक्षांत भाषण करतील. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य डॉ संजय चाकणे असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा.प्राचार्य डॉ. श्रीधर जाधव, मा. प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वितरण करणार आहेत. 

या पदवीग्रहण समारंभाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉ सुधीर वाघ ,प्र.कार्यालय अधीक्षक सुनील चव्हाण, परीक्षा समिती सदस्य डॉ.दिलीप ठुबे, प्रा.दत्तात्रय घुगांर्डे, प्रा. लक्ष्मण पठारे, सावकार काकडे, संगिता झावरे, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ वैशाली भालसिंग, प्रा.संजय गायकवाड, प्रा हरेश शेळके, प्रा.भरत डगळे, ढोकेश्वर महाविद्यालय टाकली ढोकेश्वरचे परीक्षा अधिकारी प्रकाश गावित तसेच परीक्षा अधिकारी प्रा रोकडे महाविद्यालयीन विकास समितीचे सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद परिश्रम घेत आहेत.