Breaking News

कोपरगावात आज शरीरसौष्ठव स्पर्धा


संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक,माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा आणि कोपरगांव तालुका बाॅडी बिल्डींग असोसिएशन त्याचप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानवतीने उद्या {दि. २४} सायंकाळी पाच वाजता कोपरगांव शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदानावर अहमदनगर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.

या स्पर्धेसाठी बाॅडी बिल्डर राशिद हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एशियन बाॅडी बिल्डींग फेडरेशनचे सचिव तथा इंडियन बाॅडी बिल्डींग फेडरेशनचे अध्यक्ष संजय मोरे प्रयत्नशिल आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन साई फिटनेसचे संजय सुरवसे व नाना गवळी यांनी केले आहे.