Breaking News

अर्थसंकल्पातून सरकारने जनतेला निव्वळ गाजरंच दाखवली - धनंजय मुंडे

मुंबई - या अर्थसंकल्पातून मागच्या साडेतीन वर्षाचा सरकारचा आर्थिक बेशिस्तपणा उघडा पडला असून कधी नव्हे तो 15 हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. मागच्या वर्षी 5 हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प होता. पुढच्या वर्षी ही तुटीची रक्कम 45 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. जनतेलाच गाजरं दाखवत जनतेची घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सरकारने पुन्हा एकदा जनतेला अर्थसंकल्पातून गाजराच्या पलीकडे काही दिले नाही. ज्या ज्या योजना अर्थसंकल्पात आहेत त्या 2022 आण आणि 2025 मध्ये पूर्ण होणार आहेत. कालच आ र्थिक पाहणी अहवालातून राज्याचे किती नुकसान झाले ते दिसले. कृषी विकास दर 8.30 उणे गेला. कृषी उत्पादकताही खाली गेली आहे. राज्याचा विकास दर आघाडीच्या सरकारमध्ये होता, तो सेना-भाजपला गाठता आलेला नाही. आर्थिक शिस्तीची राजवट यांना चालवता येत नाही, हेच यातून दिसले अशीही टिका धनंजय मुंडे यांनी केली. शेतकर्‍यांच्या आत्मसन्मानासाठी हा अर्थसंकल्प ठेवतोय असे अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत म्हणाले. दोन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी अर्थसंकल्प ठेवला होता. मात्र तरीही हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील शेतकरी, सामान्य जनता यांच्या तोंडाला पाने पुसणारा ठरला आहे.