Breaking News

अनोळखी इसमाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला

गडचिरोली - जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या चांदाळा शेतशिवारात एका अनोळखी इसमाचे प्रेत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याबाबत चांदाळाच्या पोलिस पाटील धनिका लोमेश मेश्राम यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर मृतक इसमाचे वय अंदाजे 30 ते 40 वर्ष असून त्याने नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर इसमाचा रंग सावळा असून उंची 5 फुट 2 इंच, चेहरा गोल, केस काळे बारीक व समोरून थोडे टक्कल आहे. बांधा मध्यम असून अंगात रेघाटी पांढर्‍या रंगाचा शर्ट व काळा फुलपँट घातला आहे. वरील वर्णणाच्या इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास गडचिरोली पोलिस ठाणे 07132233333, तपासी अंमलदार 9404345971 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक फौजदार केशव बोधनकर, नापोशि झाडे यांनी केले आहे.