Breaking News

नागपुरात 2.14 लक्ष बालकांना पाजणार पोलिओ डोस- रविंद्र खजांजी

नागपूर  - नागपूर जिल्ह्यात येत्या 11 मार्च रोजी पल्स पोलियो लसीकरण मोहिम राबवली जाणर आहे. त्यानंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या 2 दोन लक्ष 14 हजार बालकांना पोलियो डोज पाजला जाणार आहे. त्यासाठी 2528 बुथची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांची यांनी दिली. 
पोलीओचे कायम निर्मुलनाकरिता 1995 पासून संपूर्ण देशात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सन 2011 पासून देशातच नव्हे तर महाराष्ट्रात पोलीओचे समुळ उच्चाटण क रण्यात आले आहे. ही स्थिती कायम राहुन ‘पोलीओ मुक्त भारत, महाराष्ट्र तसेच नागपूर जिल्ह्याचे’ स्वप्न साकार करण्यासाठी रविवारी 11 मार्च रोजी यावर्षीच्या दुसर्‍या टप्प्यातील पोलीओ मो हिमेचे आयोजन करण्यात आले आहे.