भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना पंतप्रधान मोदींची आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त शुक्रवारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहिली. त्यांनी आपल्या जीवनाचे समर्पण केले जेणेकरून इतरांना स्वातंत्र्य आणि सन्मानाचे जीवन जगता येईल, असे ट्विट मोदी यांनी केले. भारतीय होते याचा प्रत्येक भारतीयला अभिमान आहे, असे मोदी यांनी ट्विट केले. आजच्या दिवशी 1931 मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. राम मनोहर लोहिया यांचीही जयंती असून त्यांनाही मोदींनी अभिवादन केले. लोहिया हे विसाव्या शतकातील भारतातील सर्वात उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, असे गौरवोद्गार मोदींनी काढले.