दखल - उंदीरबाँब!
आपल्याला गणपतीचं वाहन असलेला उंदीर माहीत आहे. तो जितका पूजनीय असतो, तितकाच तो तिरस्काराचाही धनी असतो. असं असलं, तरी उंदीर हा अनेकांच्या उदरभरणाचा विषय होतो. मागं मुंबई महानगरपालिकेनं उंदीर पकडण्यासाठी दिलेली जाहिरात आणि त्यासाठी दिलेल्या पात्रतेचा निकष वादाचा विषय ठरला होता. उंदीर खाऊन अनेक प्राणी जगतात, तसंच उंदीर पकडून अनेक संस्था, माणसं जगतात. उंदरामुळं अनेकांवरील संकट टळतात. विघ्नहर्त्याचं वाहन असलेला मूषक असा कोणाच्या ना कोणाच्या कधी ना कधी उपयोगी पडत असतो.
.................................................................................................................................................
देशभरातील अन्नधान्य महामंडळाच्या धान्याला पाय फुटतात; परंतु हे धान्य उंदरानं खाल्लं असं सांगितलं, की त्याची कुणीच चौकशी करीत नाही. अनेक सरकारी कार्यालयात उंदरांचा उपद्रव असतो. सरकारी काम म्हटलं, की सहा महिने थांब अशी पद्धत असते; परंतु उंदराच्या उपद्रवामुळं त्रस्त झालेली सरकारी यंत्रणा अचानक गतिमान होते! एक गोष्ट सर्वांना माहीत आहे, ती पूर्ण सांगत नाही; परंतु अकबरानं बिरबलाला दिलेलं उत्तर प्रसंगचातुर्याचा नमुना होता. एका झाडावर किती कावळे बसलेले आहेत, याचं ठराविक संख्येत उत्तर देणं शक्य नसतं; परंतु तरीही बिरबलानं चातुर्यानं एक ठराविक संख्या सांगितली. त्यापेक्षा कमी कावळे असतील, तर काही कावळे उडून गेले असतील आणि जास्त कावळे असतील, तर इतर झाडांवरून या झाडावर कावळे आले असतील, असं उत्तर बिरबलानं दिलं. महाराष्ट्राच्या मंत्रालयातूनही बिरबलावर कडी करण्यासारखं उत्तर देण्यात आलं! मुख्यमंत्र्यांकडं असलेल्या सामान्य प्रशासन विभागानं ही करामत केली. मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची काकदृष्टी आहे! काही चुकीचं दिसलं, तरी खडसे त्यावर तुटून पडतात. खरं तर भाजपच्या सरकारच्या कारभारात कोणतीही त्रुटी राहू नये, यावर खडसे यांचं किती बारकाईनं लक्ष असतं! लोक आपलं उगीच खुसपटं काढत बसतात.
आपल्याच पक्षाच्या सरकारवर शरसंधान करण्याची एकही संधी खडसे सोडत नाही. अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना सरकारवर त्यांनी ‘उंदीर बॉम्बच’ टाकला. मंत्रालयात एका आठवडयात चक्क 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याची कागदपत्रं त्यांनी सभागृहात मांडली. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचं आणि सरकारचं ही त्यांनी वाभाडं काढलं. मुंबई महापालिका दोन वर्षांत सहा लाख उंदीर मारते, तिथं सात दिवसांत एका खासगी संस्थेनं मंत्रालयात इतके उंदीर मारण्याचा पराक्रम केलाच कसा, असा सवाल त्यांनी केला. त्यांचा हा सवाल शिवसेनेला डिवचण्याचा जसा होता, तसाच सामान्य प्रशासन विभागाच्या अबु्रची लक्तरं मंत्रालयाच्या वेशीवर टांगण्याचाही होता. उंदीर मारण्याच्या या कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. एकटया मंत्रालयात जर तीन लाखावर उंदीर असतील, तर राज्यभरातील सरकारी, निमसरकारी कार्यालयं आणि महामंडळांत किती उंदीर असतील, असा प्रश्न त्यांनी केला. संबंधित संस्थेनं रोज 45 हजार 628.57 उंदीर मारल्याचं माहिती अधिकारात दिलेल्या कागदपत्रांत म्हटलं आहे. उंदीर हा पूर्ण असतो, हे सामान्य जनतेला माहीत आहे. उंदीर पकडला, तरी तो पूर्णच पकडला जाईल. अर्धवट कसा असेल, हे तुम्हा-आम्हाला पडलेले प्रश्न असू शकतात; परंतु खडसे यांना सरकारनं माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती, उंदीर अपूर्णांकात असतात, असे सांगते. असं असेल, तर खडसे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे वाभाडे नाही काढायचे, तर काय आरती करायची? मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित विभाग असला, म्हणून काय झालं? या विभागानं विनोद करू नये, असं थोडंच आहे. टवाळा आवडे विनोद असं म्हटलं जात असलं, तरी विनोदानं हास्य फुलतं. त्यामुळं आयुष्य वाढतं. खडसे यांना ते कळलं नसावं! सामान्य प्रशासन विभागानं दिलेली माहिती वाचून थोडं हसलं, तर बिघडलं कुठं? 0.57 उंदीर नवीन जन्मलेले असावेत. मिनिटाला 31.68 उंदीर मारले. दररोज मारलेल्या उंदरांचं वजन 9 हजार 125.71 किलो म्हणजे 9 टन होते. वस्तू, माल असा अपूर्णांकात असू शकतो; परंतु सामान्य प्रशासन विभागाचं गणित त्यापुढचं आहे. त्यात जन्मलेले, मारलेले उंदीर अपूर्णाकांत कसे असू शकतात, हे समजणं अवघड आहे. दररोज नऊ टन उंदीर मारले जात असतील, तर मग एक टन उंदीर मंत्रालयातून ट्रकमधून घेऊन कसे नेले? अन्य आठ टन उंदरांचं काय केलं, हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. उंदीर मारण्याचं काम एका कंपनीस 2016 मध्ये देण्यात आलं. कंपनीस मंत्रालयात गेलेले, किरकोळ, पांढरे, काळे असे तीन लाख 19 हजार 400 उंदीर आढळले. मेलेल्या उंदराची विल्हेवाट कुठं लावली याची सरकारकडं माहिती नाही. ट्रकभरून उंदीर नेताना कुणीच कसं पाहिलं नाही, हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो. सहा महिन्यांचं काम संस्थेनं सात दिवसांतच पूर्ण केलं. हा खर्च करण्याऐवजी मंत्रालयात 10 मांजरी सोडल्या असत्या, तर त्यांनी उंदीर फुकटात फस्त करून टाकले असते, या खडसे यांच्या टिप्पणीला आमदारांनी हास्यात प्रतिसाद दिला नसता, तरच नवल. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या हाती याच उंदरांसाठी आणलेलं विष लागलं आणि ते पिऊन त्यांनी आत्महत्या केली, असा सनसनाटी आरोपही खडसे यांनी केला. हे विष बाळगण्यासाठी लागणारी परवानगी या संस्थेकडं नव्हती. तसंच या विषाची मंत्रालयात साठवणूक केली आहे, याची सामान्य प्रशासन विभागाला माहिती नव्हती, असा दावा खडसे यांनी केला. एक ट्रक उंदीर मारले असतील तर त्यांना विल्हेवाट लावताना कुणी कसं पाहिलं नाही? हे उंदीर कुठं पुरले, त्यांना कुठं जाळले याची कुठंही नोंद नाही. यासाठी किती विष लागलं? मंत्रालयात विष आणलं कसं? त्याला परवानगी दिली कुणी? त्याची नोंद कुठं? अशा प्रश्नांची सरबत्ती खडसे यांनी केली. या उंदरांचं उत्तर घ्यायचं कुणाकडं, असा सवाल पीठासीन अधिकारी अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. खडसेंनी हा विषय सामान्य प्रशासनाचा आहे, असं सांगताच आणि हा विभाग मुख्यमंत्र्यांकडं आहे, हे लक्षात येताच सभागृहात हास्यकलोळ थांबत कमालीची शांतता पसरली. मुंबई महापालिकेनुसार मुंबईत सहा लाख उंदीर आहेत. मग, एकटया मंत्रालयात तीन लाख 37 हजार उंदीर कसे? जर मंत्रालयात इतके कुरतडणारे उंदीर असतील तर राज्यातील शासकीय कार्यालय आणि महामंडळात किती उंदीर असतील, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये पुन्हा खसखस पिकली.