अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडणा-या महिला दलाल अटकेत
उल्हासनगर येथील ओटी सेक्शन परिसरात अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक, मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत या दोघींना अटक करण्यात आली. तेथून 3 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी 2 अल्पवयीन मुली आहेत. त्या 3 मुलींची पोलिसांनी सुटका के ली असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.