Breaking News

सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज

गडचिरोली, दि. 19, मार्च - पाणी हे जीवन आहे परंतु अशुद्ध पाण्यामुळेच अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची योग्य ती तपासणी करूनच पाणी पिणे योग्य आहे. सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती उपसभापती मनोज दुनेदार यांनी केले. 

यावेळी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत आयोजित पाणी व गुणवत्ता कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना दुनेदार बोलत होते.कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी. एल. मरस्कोल्हे, सहाय्यक गट विकास अधिकारी एन. पी. मेश्राम ,विस्तार अधिकारी अरविंद मांडरेवार, आरोग्य विभागाचे विस्तार अधिक ारी रणदिवे व उंदीरवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा पाणी व गुणवत्ता या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व गुणवत्ता सल्लागार मोरेश्‍वर गेडाम तर संचालन गट समन्वयक प्रकाश चौधरी यांनी केले. यावेळी अंगणवाडी सेविका , अशा वर्कर, जलसुरक्षक ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .