सोलापूर, दि. 19, मार्च - शेळगी, मित्रनगर परिसरातील कुमारस्वामी सोसायटी येथील विद्युत तारा तुटल्या. मात्र सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही. या तारांची उंची कमी असल्यामुळे याचा धोका कायम आहे. याबाबत शासनानेसुध्दा दखल घेतली. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्यामुळे नागरिकांतून तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. या परिसरातील विद्युत तारा तुटल्यानंतर महावितरणाने लगेच दुरुस्ती केली. या तारांची उंची वाढवली जात नाही. घरांच्या गच्चीवर अगदी दोन फुटांच्या अंतरावर या विद्युत तारा आहेत. कुमारस्वामी सोसायटीमधील अनेक घरांवरून या विद्युत तारा गेल्या आहेत. याबाबत अनेक वेळा सांगूनही महावितरणाने दखल घेतली नाही. तीन वेळा दखल घेतली नाही. चौथ्यांदा महावितरणच्या अधिकार्यांनी दखल घेतली आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या विद्युत तारांची उंची वाढवून घेऊ, अशी हमी दिली. याला महिना उलटला मात्र अद्याप प्रत्यक्षात काम सुरू झालेले कुठेच दिसत नाही. त्यामुळे नागरिक ांतून संताप व्यक्त होत आहे.
शेळगी, मित्रनगर परिसरातील विद्युत तारा तुटल्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:26
Rating: 5