Breaking News

हेवाळे झाला धुरमुक्त गाव !

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, मार्च - हत्तीबाधित गाव असूनसुद्धा वन संवर्धनासाठी हेवाळे ग्रामचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार जिल्ह्याचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी क ाढले. गतवर्षी संत वनग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावणार्‍या स्मार्ट ग्राम हेवाळेचं वनव्यवस्थापन समिती अंतर्गत झालेल्या वन संवर्धन कार्याचे मुल्यांकन येत्या 7 मार्चला राज्यस्तरीय समिती करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आणि हेवाळे वनव्यवस्थापन समिती अंतर्गत गावातल्या पात्र लाभार्थ्यांना एलपीजी स्वयंपाक गॅस वितरण करण्यात आल. या कार्यक्रम प्रसंगी चव्हाण बोलत होते.

संत वनग्राम स्पर्धेत गतवर्षी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावणार्‍या स्मार्ट ग्राम हेवाळेने संपूर्ण गाव धूरमुक्त करण्याचा उद्देश पूर्ण केला. वनव्यवस्थापन समिती अंतर्गत गावातल्या पात्र 25 कुटुंबाना स्वयंपाक गॅसचं वितरण चव्हाण यांचे हस्ते करण्यात आल. यावेळी हेवाळे गावचे सरपंच तथा वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देसाई, सचिव वनपाल दत्ताराम देसाई यांसह मान्यवर आणि समिती सदस्य तसच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेवाळे ग्रामने वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून यापूर्वी 80 कुटुंबाना सवलतीच्या दरात एलपीजी स्वयंपाक गॅस, तर पशुपालकांना बायोगॅस आणि गावातल्या प्रत्येक कुटुंबाला निर्धुर चुलींचे वाटप केल आहे. वनव्यवस्थापन समितीचा वनसंवर्धनासाठी हा उपक्रम राबवत तब्बल 105 कुटुंबांना एलपीजीचा लाभ दिला आहे. इतकेच नव्हे तर पशुपालकांना बायोगॅस तर प्रत्येक कुटुंबाला सुधारित चुलींचसुद्धा वाटप करून हेवाळेने आदर्श निर्माण केला आहे.
उर्वरित मागणी असलेल्या सर्व कुटुंबानासुद्धा एलपीजी स्वयंपाक गॅस वाटप करून हेवाळे गाव खर्‍या अर्थाने धुरमुक्त केला. भविष्यात नव्याने नोंद होणार्‍या कुटुंबाना सुद्धा सवलतीच्या दरातील एलपीजी स्वयंपाक गॅस वाटप करण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे यावेळी सरपंच तथा वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्पष्ट केले आहे. तर वनखात्याच्या सहकार्याबद्दल सुद्धा आभार मानले.