Breaking News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, मार्च - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत याच्या जिल्ह्यात आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघात असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातल्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेत. या रुग्णालयाची दुरवस्था पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर यांना धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेची आरोग्यसेवे बाबतची उदासीनता दिवसेंदिवस ठळक होत आहे. आरोग्य यंत्रणेचा दर्जा टिकवण्यासाठी मंत्री, राजकीय पदाधिकारी कोणीही ठोस पावल उचलताना दिसत नाहीत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातली भयावह परिस्थिती पहिली कि बाब अधिकच अधोरेखित होते. ज्या रुग्णालयात गरीब सर्वसामान्य लोक उपचारासाठी येतात. महिला भगिनींना डिलिव्हरीसाठी आणल जात, त्या रुग्णालयातल्या स्वच्छतागृहांची परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे. येथील आढावा घेतला असता धक्क ादायक वास्तव समोर आले. या स्वच्छतागृहाच्या दरवाजांना आतून कड्याच नाहीत. शौचलयातले भांड फुटल आहे. महिला स्वच्छतागृहाचा दरवजा तुटल्यामुले बाजूला काढून ठेवला आहे. छपरावरची कौल फुटली आहेत. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे हे काम करणार्‍या ठेकादाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.