बालगृहाच्या मदतीसाठी शांतीवन खंबीरपणे उभे - नागरगोजे
येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या आर्वी येथील शांतीवनचे संस्थापक दिपक नागरगोजे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच बांधकामासाठी लागणारे पत्रे देण्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ, द्वारका पवार, विशाल पवार, बाबासाहेब डोंगरे, आजिनाथ शिंदे, मोहन शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंतच्या सामाजिक तसेच शैक्षणिक जीवनातील अनेक अनुभवांना उजाळा देत सुरू असलेल्या कामात लोकांनी केलेली मदत अत्यंत महत्त्वाची असून, त्यातूनच आपण अतिशय नियोजनबद्ध काम उभे करून, त्यामध्ये योग्य बेनिफीट देऊन मदत करणार्या व्यक्तींना दिलेल्या मदतीबद्दल समाधान वाटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने सुरू केलेल्या अनाथ, निराधार, लोककलावंत, ऊस तोड मजूर, वीटभट्टी कामगार, आदिवासी, दलित, वंचित दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या निवारा बालगृहाच्या कोणत्याही मदतीसाठी शांतीवन पाठिशी खंबीरपणे उभे राहिल असेही ते यावेळी म्हणाले. दिपक नागरगोजे यांचा संस्थेचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. अशी माहिती निवारा बालगृहाचे अधिक्षक संतोष गर्जे यांनी दिली.