Breaking News

आता ग्रामिण बस थांबा.....


जामखेड येथील नवीन बसस्थानक हे शहराच्या मध्यभागापासून अर्धा कि.मी. आहे. त्यातच ग्रामीण भागाकडे जाणार्‍या बस खर्डा चौकात थांबत होत्या. चौकात बस थांबल्याने मोठया प्रमाणात वाहतूक ठप्प होत होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना याचा सामना महिला व शालेय विद्यार्थीनी यांना करावा लागत होता. अनेक राजकीय पक्षांनी आगारात ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी बस थांबा चालू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार येत्या आठ दिवसांत आगारात बस थांबा चालू होणार असून ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकरी, महिला, विद्यार्थी यांची सोय होणार आहे.