Breaking News

जामखेड शहरात अतिक्रमणाची लवकर मोठी कारवाई करणार

अहमदनगर - बीड रस्त्यावरील बस आगार समोरील रस्ता लगतची अतिक्रमणे दि. 14 मार्च रोजी सायं. 6 वा. काढण्यात आली. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसह अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
शिर्डी - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीत काम एप्रिल मध्ये सुरू होणार असून त्या अगोदर रस्त्यावरील झाडे, खांब काढण्याची मोहीम सुरू होत आहे. 


शहरातुन जाणार्‍या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहेत. त्यामुळे शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपात आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यासाठी अतिक्रमण हटविण्याची विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मोठी कारवाई करणार असुन रस्त्याचा श्‍वास मोकळा केला जाणार आहे अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता लियाकत काझी यांनी दिली. 
तीस वर्षापासुन जुने बसस्थानक बसथांबा म्हणून वापरात आणण्याची मागणी होत होती, परंतू आगार प्रमुख शिवाजी देवकर यांची संकल्पना कृतीत उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.