‘लोकमंथन’वर शुभेच्छांचा वर्षाव ना. चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट; मान्यवरांच्या मांदियाळीत रंगला दशकपूर्ती सोहळा
अहमदनगर : सामाजिक जाणिवा व जागृती जपत पत्रकारितेचा एक मापदंड ठरलेल्या दैनिक लोकमंथन च्या दशकपूर्ती सोहळयाच्या वर्धापनदिनानिमित्त अनेक मान्यवरांनी लोक मंथनच्या प्रांगणात प्रत्यक्षात भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. वाचकांशी व जनसामान्य जनतेशी जिव्हाळयाचे नाते सांगणार्या दैनिक लोकमंथनवर कौतुकांची थाप टाकत, भविष्यात देखील अशीच आक्रमक आणि सडेतोड पत्रकारिता आम्हाला दैनिक लोकमंथनमधून बघायला मिळेल अशी अपेक्षा, वाचकांनी व्यक्त केली. तर पत्रकारितेचा घेतलेला वसा असाच कायम सांभाळत राहून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडू, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीच दैनिक लोकमंथनचे मुख्यसंपादक अशोक सोनवणे व रो हित सोनवणे यांनी यावेळी दिली.
यावेळी दैनिक लोकमंथनने गेल्या दहा वर्षांत समाजप्रबोधनाची पावती म्हणून, सर्वच क्षेत्रातील जाणकार मंडळींनी शुभेच्छा देतांना, भविष्यातही लोकमंथन समाजाच्या आकांक्षासोबत कायम राहील अशी अपेक्षा केली. आपल्या कार्यव्यस्ततेतूनही वेळी काढत महसूल, तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपादक अशोक सोनवणे यांच्याशी मोजक्या शब्दांत चर्चा करतांना, लोकमंथनने वारंवार कान टोचल्यामुळे समाजातील अनिष्ट प्रवृत्ती भानावर येतात, हे वास्तव स्वीकारतांना पत्रकारितेचा धर्म म्हणजे काय? याचा धडा लोकमंथनने दिले, हे मान्य करावे लागते.
सनईचा मंजूळ स्वर, अंबर प्लाझा परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि राज्यभरातून आलेल्या प्रमुख मान्यवरांसह ‘दैनिक लोकमंथन’वर प्रेम क रणार्या असंख्य वाचकांच्या मांदियाळीत लोकमंथनचा दशकपूर्ती सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगला. गेल्या दहा वर्षांपासून बहुजन चळवळीचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले दैनिक लोक मंथन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांनी व वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमासाठी कला, क्रिडा, साहित्य, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महापौर सौ. सुरेखा कदम, सुभाष गुंदेचा, मीनाताई मुनोत, रावसाहेब तनपुरे, राष्ट्रवादीचे माणिक विधाते, मनपा विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, बाळ ज. बोठे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र आघाव, प्रेस क्लबचे मन्सूर सय्यद, राजेंद्र गांधी, संजय चोपडा, शाम शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण, तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश सपकाळे, नगर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि किशोर परदेशी, उपकारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, प्रसिद्ध विधिज्ञ शिवाजी कराळे, ऍड. रविंद्र शितोळे, भाजप नेवासा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे आदी मान्यवरांसह शेकडो वाचक यावेळी उपस्थित होते. (सविस्तर वृत्त उद्यांच्या अंकात)