Breaking News

मलनिस्सारण केंद्रासाठी 180 कोटींची योजना मंजूर


सोलापूर, 19 मार्च : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरातील ड्रेनेजलाइन आणि दोन मलनिस्सारण केंद्रासाठी 180 कोटींची योजना मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर क ाढण्यात आले असून, अंतिम मान्यतेसाठी सभागृहाकडे प्रस्ताव आल्याचे सांगण्यात आले. 180 कोटींची ड्रेनेज लाइनची कामे हद्दवाढ भागात आहेत. ज्या भागात ड्रेनेज नाही तेथे काम करण्यात येईल. यासाठी महापालिका आयुक्तांनी टेंडर प्रक्रिया राबवली. त्यापैकी एकास मक्ता निश्‍चित करून सभागृहाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला. स्थायी स मिती सभापती पद रिक्त आणि न्यायालय प्रविष्ट असल्याने प्रस्ताव स्थायी समिती ऐवजी सभागृहाकडे पाठवण्यात आला आहे.