Breaking News

मिरावली दर्ग्याचा आजपासून संदल व उरूस


शहरातील चितळेरोड परिसरातील हजरत सय्यद हैदर शाह उर्फ मिरवली दर्गाच्या संदल उरुसाचे कार्यकर्म आयोजित करण्यात आले आहे. दि.१७ आणि १८ असे दोन दिवस यानिमित्त कार्यक्रम होणार आहे. संदलनिमित्त दर्ग्यावर फुलाची चादर, गलेफ चढविला जाणार आहे. दि. १८ रोजी दुपारी साडेबारा वाजता हलवा प्रसादाचे वाटप होणार आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रसाद व दर्शन घ्यावे, असे आवाहन दर्ग्याचे मुजावर {पुजारी} शेख रहेमान, शेख अनिस, शेख अशपाक रहमान आदींनी केले आहे.