Breaking News

आर्थिक स्वावलंबनाचा प्रयत्न बळ देणारा : तांबे


आनंद मेळाव्याच्या माध्यमातून उदयोजक महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा हा प्रयत्न त्यांच्या पंखांना बळ देणारा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. 

जागतिक महिलादिनानिमित्त अ. भा. ब्राह्मण महासंघाच्यावतीने आनंद मेळाव्याचे आयोजन मिळाव्यात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्यास सामाजिक कार्यकर्त्या रचना मालपाणी, ओम स्कूलच्या संस्थपिका कल्याणी कुलकर्णी, आरोग्य सभापती सोनाली शिंदे त्याचप्रमाणे पुरस्कारार्थी शैला गाडगीळ, शैला सराफ, संगीत निसाळ, सुमन पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रचना मालपाणी यांनी महिलांना प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ यांच्या संवादाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमप्रसंगी समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ भगिनींचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या या उपक्रमाचे मान्यवरांसह संगमनेरकरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या तालुकाध्यक्ष मीनल जोशी, शहराध्यक्षा वंदना जोशी, कार्यकारिणी सदस्या स्वप्ना संत, जयश्री नाईक, अमृता सराफ, प्राची मुळे, वैशाली कुलकर्णी, गीतांजली सराफ, आरती कुलकर्णी, डॉ वैशाली कुलकर्णी, तृप्ती कुलकर्णी, देवयानी संभूस, दिपाली उपासनी आदी अनेकांनी परिश्रम घेतले. यासाठी ब्राह्मण प्रतिष्ठान, युवा मंच या पुरोहित संघाचे विशेष सहकार्य लाभले. शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या या आनंद मेळाव्यास संगमनेरकरांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. प्रारंभी संघाच्या प्रवक्त्या वैशाली कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन आरती कुलकर्णी यांनी केले. स्वप्ना संत यांनी आभार मानले.