Breaking News

शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार : विखे बालआनंद मेळावा उत्साहात


जिल्हापरिषदेच्या शाळांमधून बालआनंद मेळाव्यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त अशा कला-गुणांना वाव मिळातो. यासाठी हे मेळावे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम करत आहेत. या मेळाव्यांमधून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक व सामान्य ज्ञानात भर पडली आहेत. त्यामुळे शिक्षण हे भविष्यातील पिढी घडवण्याचे काम करत आहे. त्यामुळेच शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरत आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केले.

दाढ बुद्रुक (ता. राहता) येथे जिल्हापरिषदेच्यावतीने आयोजित दाढ व कोल्हार अतंर्गत येणाऱ्या शाळांच्या बालआनंद मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य दिपक बर्डे होते. याप्रसंगी सभापती हिरा कातोरे, भरत अंत्रे, नंदा तांबे, देवीचंद तांबे, प्रतापराव तांबे, अशोक गाडेकर, गटशिक्षणाधिकारी मिना शिवगुडे, सरपंच पूनम तांबे, उपसरपंच गोकूळ गाडेकर, भारत वाकचौरे, डी. डी. वाकचौरे, केंद्रप्रमुख शंकुतला निंबाळकर, सरपंच रिना खर्डे, सरपंच रावसाहेब खर्डे, योगिता बनसोडे, मुख्याध्यापक सहादू वाडेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी शिक्षक अरुण ब्राम्हणे, विश्वास गायकवाड व श्रीराम महावीर यांनी उभारलेल्या ‘मनकवडा खेळ’ या दालनातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी शालिनी विखे यांनी संवाद साधला. सूत्रंसचालन साहेबराव टपळे यांनी केले. अरुण ब्राम्हणे यांनी आभार मानले.