Breaking News

कथाकथन स्पर्धेत बाळासाहेब इथापे प्रथम


कोपरगाव ता. प्रतिनिधी - जिल्हा पातळीवरील कथाकथन स्पर्धेत पढेगाव जिल्हा परिषद शाळेचा बाळासाहेब इथापे याने बाजी मारत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. बालपणीच पितृछाया हरवलेल्या बाळासाहेबने अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत आईच्या आधाराने पढेगावच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. या स्पर्धेत तीन विषय देण्यात आले. या विषयांवर अवघ्या पाच ते सात मिनिटांत कथा सादरीकरण करावे लागते. अंधश्रद्धा, शिक्षण, विज्ञान या तीन विषयांचा मिलाप घडवत इथापे याने उत्कृष्ट कथाकथन केले. त्याच्या या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, मुख्याध्यापक बाळासाहेब साबळे, आदींसह अनेकांनी कौतूक केले.