Breaking News

शेती पंपाची वीज पुरवठा वेळापत्रक पुर्ववत करण्याची मागणी


पानेगाव/ प्रतिनिधी /- नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परिसरात शेती पंपासाठी करजगाव ३३/११केव्ही. मधुन पुरवठा होत असून हे वेळापत्रक पुर्ववत करा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. 

तालुक्यातील निंभारी, अंमळनेर, गोणेगाव, इमामपूर, करजगाव, शिरेगाव, पानेगाव,आदी गावांतील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या अगोदरचे वेळापत्रक हे सकाळचे १०:३० ते सायंकाळी ६:३०वाजेपर्यंत तर रात्रीचे वेळापत्रक हे रात्री ११वाजेपासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत असायचे. परंतु आठवडाभरा पासून नविन वेळापत्रकनुसार सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत तर रात्रीचे संध्याकाळी ९ ते सकाळी सात वाजेपर्यंत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वीजेचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी बिबट्याचे दहशतीने जाताच येत नसून सकाळी तर सात वाजता वीज बंद होत असते. यासाठी वीज पुर्ववत करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा पानेगाव सरपंच संजय जंगले, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष किशोर जंगले, सतिश फुलसौंदर, चंद्रकांत टेमक, अंमळनेर सरपंच अच्युत घावटे, निंभारीचे सरपंच संदिप जाधव, शिरेगाव उपसरपंच निरंजन तुवर, माजी सरपंच किरण जाधव आदींनी दिला आहे.